शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

दुष्काळात तेरावा : नगर तालुक्याची तहान भागविणारी बु-हाणनगर योजना संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:26 IST

जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागविणा-या आणि तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरलेल्या बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन दुष्काळजन्य स्थितीत संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देपाणी पट्टीची साडे तीन कोटी आणि वीजबिलाची साडे चौदा कोटीची थकबाकी

योगेश गुंडकेडगाव : जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागविणा-या आणि तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरलेल्या बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन दुष्काळजन्य स्थितीत संकटात सापडली आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका योजनेत समाविष्ट असणा-या ३८ गावांना बसत आहे. योजनेतून पाणी घेणा-या गावांकडे साडे तीन कोटींची पाणीपट्टी थकली असून योजनेकडे वीजबिलाची साडे चौदा कोटींची थकबाकी थकली आहे. यातून मार्ग निघाला नाहीतर ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याची वेळ येणार आहे.टँंकर मुक्त नगर तालुक्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नाने ४४ गावांची बु-हाणनगर व १७ गावांची घोसपुरी पाणी योजना कार्यान्वित झाली. या दोन्ही योजना दुष्काळी नगर तालुक्यासाठी वरदान ठरल्या. यामुळे नगर तालुक्यातील टेंकरची संख्या निम्म्याने घटली. गेल्या १२ वर्षांपासून या योजना सुरु असून दुष्काळात या योजनांनी तालुक्याची तहान भागविली आहे. घोसपुरी पाणी योजनेला विसापूर तलावातून पाणी आणले जाते. या योजनेची थकबाकी ४३ लाख रुपये इतकी होती. मात्र या योजनेने सरकारी योजनेत सहभाग घेऊन थकबाकीचे १० लाख भरले. उर्वरित १० लाख शासन भरणार असून बाकीचे २३ लाख रुपये माफ होणार आहेत. यामुळे घोसपुरी पाणी योजनेचे आर्थिक संकट तूर्त टळले असले तरी पाण्याचे कमी होणारे स्रोत आणि वारंवार येणा-या अडचणी यामुळे घोसपुरीचे संकट केव्हाही मानगुटीवर बसू शकते. या योजनेची समिती असून त्यामार्फत योजनेतील अडचणी सोडवल्या जात आहेत. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले या समितीचे अध्यक्ष आहेत.जवळपास निम्म्या तालुक्याची तहान भागवणार्या बुर्हाणनगर पाणी योजना मात्र आर्थिक संकटात सापडली आहे. हि योजना जिल्हा परिषदकडे हस्तांतरित झालेली असून नियोजनाआभावी योजनेची साडेसाती सुरूच आहे. योजनेत सहभागी असणा-या गावांकडे पाणी पट्टीच्या वसुलीपोटी ३ कोटी ४७ लाख २ हजार ४४६ रुपये थकले आहेत. वारंवार मागणी करूनही हि गावे थकबाकी भरत नसल्याने हि योजना चालवायची कसी असा प्रश्न जिल्हा परिषदच्या प्रशासनला पडला आहे. थकबाकीचा आकडा वाढत असल्याने योजनेवर खर्च कशातून करायचा याची अडचण निर्माण झाली आहे. या योजनकडे वीजबिलाची साडे चौदा कोटींची थकबाकी झाली असून हि थकबाकी भरली नाहीतर योजनेची वीज केव्हाही तोडली जाऊ शकते असे झाल्यास या गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.योजनेसाठी रोज ८ ते ९ तास पंपिंग करणे आवश्यक असताना रोजचे २० तास पंपिंग केले जाते. आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. योजनेतून अनेक जन चोरून पाणी वापरत आहेत. काही शेतक-यांनी या योजनेची जलवाहिनी मधेच ताडून पाणी शेतीकडे वळवले आहे. परिणामी काहीना पाणी मिळते तर काहीना नियमित पाणी मिळत नाही.नागरदेवळे गावात दीड कोटीची थकबाकीबु-हाणनगर पाणी योजनेपोटी सहभागी गावांकडे साडे तीन कोटींची थकबाकी असून एकट्या नागरदेवळे गावाकडे १ कोटी ६० लाखांची थकबाकी आहे. तर बु-हाणनगर गावाकडे १५ लाख ८२ हजार, वडारवडी कडे १७ लाख ७४ हजार, कापूरवाडीकडे १८ लाख, केकती-शहापूरकडे २९ लाख अशी मोठ्या गावांकडे थकबाकी आहे. यामुळे हि योजना आर्थिक संकटात सापडली आहे.दुष्काळ आढावा बैठकीस एकच आमदारपालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात तालुक्याची टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यास तीन आमदारांचा तालुका असताना केवळ आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित राहिले. उर्वरित दोन आमदारांनी याकडे पाठ फिरवली. यामुळे या योजनेच्या थकबाकीचे कोणतेच नियोजन झाले नाही.देहेरे जिल्हा परिषद गटातील ११ गावे बु-हाणनगर योजनेची पाणी पट्टी नियमित भरतात.म् ाात्र जी गावे नियमित बिले भरत नाहीत त्यांच्यामुळे इतर गावांना नाहक पाणी टंचाई सोसावी लागते. त्यामुळे जी गावे पाणी भरतात त्यांचे पाणी मीटर स्वतंत्र बसवावे.- प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्यअनेक संकटावर मात करत आम्ही घोसपुरी योजना चालवत आहोत. ती यशस्वी करून दाखवली.आता आम्ही बु-हाणनगर योजनेकडे लक्ष घालणार आहोत. - संदेश कार्ले, अध्यक्ष, घोसपुरी पाणी योजना समिती

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर