शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

अहमदनगर : दहावी आणि बारावीतील गुणवंतांच्या पाठीवर ‘लोकमत’ने कौतुकाची थाप दिली. गुणवंतांना पेढे भरवून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर : दहावी आणि बारावीतील गुणवंतांच्या पाठीवर ‘लोकमत’ने कौतुकाची थाप दिली. गुणवंतांना पेढे भरवून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. विळदघाट येथील विखे फौंडेशनच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या सत्काराने विद्यार्थी आणि त्यांचे पालक हरखून गेले. लोकमत युवा नेक्स्ट व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्यातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी एन. बी. धुमाळ, विखे फाऊंडेशनचे डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पी. एम. गायकवाड, डॉ. अरुण इंगळे, लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख अनंत पाटील आदी उपस्थित होते.एन. बी. धुमाळ यांनी प्रेरणादायी आणि ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकासाचे मंत्र दिले. ते म्हणाले, करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. तरीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आपला पाल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालकांनीच मुलांचे शिक्षक झाले पाहिज. दहावीच्या परीक्षेत यश मिळविल्यानंतर मुलांना ज्या क्षेत्रात रुची असेल त्याच क्षेत्रात जाणे गरजेचे आहे.आयबीएमआरडीचे संचालक डॉ. अरुण इंगळे म्हणाले की, मुलांना यशाचा उत्साह टिकविता आला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत स्वातंत्र्य दिले पाहिजे. तसे झाले तरच विद्यार्थ्यांचा भविष्यातील यशाचा आलेख उंचावू शकेल. वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन डॉ. विश्वास पेंडसे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल खंदारे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता पालकांचे व गुरुजनांचे ॠण व सामाजिक ॠण याचे सतत भान ठेवावे. त्यांचा आदर राखण्याचा सतत प्रयत्न करावा. -डॉ. अशोक राऊळ, प्राचार्य वैद्यकीय महाविद्यालयगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अगदी अविस्मरणीय क्षण आहे. कारण ही कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन नक्कीच भविष्यात उत्तुंग यश मिळवतील. - प्रा. डॉ. पी. वाय. पवार, प्राचार्य, कॉलेज आॅफ फार्मसीगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट असते. सोबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहे -प्राचार्य ए. एस. पुंड, कॉलेज आॅफ अ‍ॅग्रीकल्चर