शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडून चोरट्यांनी २० लाख लांबविले; बाभळेश्वर येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:04 IST

बाभळेश्वर (ता.राहाता) येथील बँक आॅफ  महाराष्ट्र शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोडले. यातून सुमारे १९ लाख ९३ हजार २०० रुपये  इतकी रोकड लांबविली आहे. 

बाभळेश्वर : बाभळेश्वर (ता.राहाता) येथील बँक आॅफ  महाराष्ट्र शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोडले. यातून सुमारे १९ लाख ९३ हजार २०० रुपये  इतकी रोकड लांबविली आहे. बाभळेश्वर येथे लोणी संगमनेर रोडलगत घोगरे पेट्रोल पंपाच्यासमोर बँक आॅफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेचे येथे एटीएम आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचा दरवाजा तसेच  इतर साहित्याची तोडफोड करुन आत प्रवेश केला. संपूर्ण एटीएम बाहेर काढले. एटीएम जड असल्यामुळे ते एटीएम वाहनापर्यंत ओढून नेण्यात आले. एटीएम ओढून नेल्याच्या येथे खुणा आहेत. एटीएमच्या आवाजाने परिसरातील काही नागरिक जागे झाले. याची चाहूल चोरट्यांना लागली. त्याक्षणी चोरट्यांनी एटीएम गाडीला लावून लोणीच्या दिशेने धूम ठोकली. एटीएमचे बरेच पार्ट रस्त्याच्याकडेला पडले होते. बाभळेश्वर येथील काही तरुणांनी चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु भरधाव वेगाने ती गाडी निघून गेली. वाहन कोणते होते हे मात्र समजू शकले नाही. आजपर्यंत या ठिकाणी दोनदा एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे फुटेज दिसत नाही. महाराष्ट्र बँक खासगी कंपनीद्वारे एटीएम चालवते. बँकेची सुरक्षा ही रामभरोसे आहे. या चोरीप्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताatmएटीएमtheftचोरी