ब्राह्मणी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे बुधवारी रात्री बापूसाहेब नवाळे यांच्या मालकीच्या मातोश्री टायर्स या दुकानाचे कटावणीच्या साह्याने अलगद कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. गत महिन्यात नवाळे यांनी टायर्सचे नवीन दुकान सुरू केले. पंक्चर साहित्य व मशिनरी खरेदीसाठी त्यांनी बँकेतून रक्कम काढून ठेवली होती. माहिती समजताच गुरुवारी सकाळी पोलीस दिनकर चव्हाण, एकनाथ आव्हाड, रोहित पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दोन दुकानात चोरट्यांनी उचका पाचक केली. मात्र, हाती काही लागले नाही. आधीच्या दुकान फोडीच्या घटनेचा तपास बाकी असताना ब्राह्मणीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरीचा कसून तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेवू अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांनी दिली.
ब्राह्मणीत चोरट्यांनी टायर्सचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:27 IST