शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 19, 2023 17:02 IST

सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत कटरच्या साह्याने एटीएम तोडले. एटीएममधील रोख रक्कम दहा लाख ८३ हजार ७०० रुपये घेऊन चोरट्यांनी पोबोरा केला. सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते. मात्र त्यांना ते तोडण्यात यश आले नव्हते अखेर पुन्हा त्यांनी याच बँकेवर लक्ष करत बँकेचे प्रशासन व पोलिसांच्या नाकावर टिच्चून एटीएम तोडून त्यातील रक्कम पळवली. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

बँकेशेजारी असलेले जय भद्रा फिटनेस क्लबचे व्यवस्थापक राजेंद्र रोहमारे व बाबासाहेब घेर हे क्लब सुरू करण्यासाठी पहाटे आल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ बँकेचे मॅनेजर बी. डी. कोरडे, बाबासाहेब खंडीझोड यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. बँकेचे मॅनेजर व प्रशासन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व कर्मचारी पोहेगावात दाखल झाले. एटीएम तोडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी घेतली. अशाच पद्धतीने तळेगाव येथीलही बँकेचे एटीएम या चोरट्यानी रात्रीच फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. 

याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री दोन वाजता शिर्डी पोलीस स्टेशनची पेट्रोलिंगची गाडी पोहेगाव वरून गस्त घालून गेली होती. त्यानंतर चोरट्याने हा मोका साधला. पोहेगाव पोलीस दूर क्षेत्र गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याने अशा घटना घडत आहेत, असे नागरिकांनी बोलून दाखवले. पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासाठी वेळोवेळी आंदोलन उपोषणे करण्यात आली मात्र पोलीस प्रशासनाने यांनी याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी