टाकळीभान येथील चंद्रकांत दादा लांडगे यांच्या मालकीचे भोकर परिसरात फर्निश प्लाजा हे फर्निचर व गृहउपयोगी वस्तूचे प्रशस्त दालन आहे. गुरुवारी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दालनाचे मागील बाजूचे पत्र्याचे स्क्रू खोलून पत्रा वाकवून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी लांडगे झोपलेले होते. मात्र, कुठलाही आवाज न करता चोरट्यांनी आत प्रवेश करून, दोन एलईडी व दोन होम थिएटर असा एकूण ४२ हजार ४०० रुपयांचा माल चोरून नेला. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान लांडगे हे पाठीमागील बाजूस चक्कर मारण्यास गेले असता, त्यांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शरद गायमुखे हे करीत आहेत.
चोरट्यांनी फोडले दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST