शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

उड्डाणपूल,सीना सुशोभिकरण ‘त्यांनी’च अडविले

By admin | Updated: June 10, 2014 00:13 IST

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले.

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले. माझ्या वयाइतके त्यांचे राजकारण आहे. मग २५ वर्षात शहरासाठी त्यांनी काय केले? असा सवाल करत महापौर संग्राम जगताप यांनी आमदार राठोड यांच्यावर पत्रकार परिषदेत टिकास्त्र सोडले. जगताप म्हणाले, पाणी प्रश्न निमित्त आहे. मुंबईत एका उद्योजकाची भेट घेतली त्याची पोटदुखी त्यांना आहे, ते खरे मूळ कारण आहे. उद्योजकाला चुकीचे काम सांगयाचे, ते त्याने केले नाही की त्याला धमकावयाचे अन् पळवून लावयाचे असा त्यांचा कार्यक्रम आहे. आजपर्यंत राठोड यांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचे काय झाले हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातील बहुतांश प्रश्न हे अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. उड्डाणपुलाचे काम त्यांनीच बंद पाडले. आमचा व्यवसाय तेथे असला तरी पूल गृहीत धरून आम्ही प्रकल्प उभारला आहे. मात्र त्यांच्या समर्थकांसाठी त्यांनी पुलाचे काम बंद पाडले. असाच प्रकार सीना नदी सुशोभिकरणाचा झाला. उघडपणे विरोधाची भूमिका घेत त्यांनी सुशोभिकरणाचे काम हाणून पाडले. त्यांच्या समर्थकांच्या जमिनी, अतिक्रमणे त्यात निघणार होती. आज ते ज्या कामांची पाहणी करत आहे त्यासाठी निधी मीच आणला हे ते विसरले काय? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. दहशतीच्या जीवावर निवडून येता या आरोपाचे खंडण करताना जगताप म्हणाले, हे जसे ग्राह्य धरले तर आमची दहशत फक्त वार्डापुरती आहे. तुम्ही तर आमदार आहात मग तुमची दहशत तर शहरावर आहे. मी सातत्याने महापौर नाही, तुम्ही तर २५ वर्षापासून आमदार आहात, शहरासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्न त्यांनी केला. पाणी प्रश्न काल उद्भवला नाही, अनेक वर्षापासूनचा आहे. त्याचे मूळ महापालिका नाही, आम्हीही विरोधक असताना याप्रकरणी मोर्चा काढला पण तो महावितरणवर होता. शहराचा त्यांचा अभ्यास फार जुना आहे. कोणावर कधी व कसं खापर फोडायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. इतक्या छोट्या विषयात मी पडणार नाही. आमच्यासमोर विकासाचे अनेक कामे आहेत. ती पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मित्रपक्षाच्या आरोपाचे अवलोकन करा..आम्ही राजकीय विरोधक आहे. आरोप करणारच. पण त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपा खासदारांच्या नगरसेवक मुलाने त्यांच्यावर अनेक आरोप केले आहे. त्याचे तर अवलोकन करा असा सल्ला महापौर जगताप यांनी दिला. सारसनगर, केडगाव हे आमच्या एकट्याचे नाही. तुमच्याच मतदारसंघात आहे याचे भानही त्यांनी ठेवले पाहिजे. टॅँकरचे ठेकेदार तुमच्या शेजारीच...शहराच्या काही भागात टॅँकरने पाणी सुरू आहे. गत अनेक दिवसांपासून टॅँकर सुरू आहेत. जे टॅँकरने पाणी पुरवतात ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता टॅँकरच्या खेपावर लक्ष ठेवावे लागेल. टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम गत अनेक वर्षापासून सुरू आहे. आम्ही ते सुरू केलेले नाही. वाढत्या उपनगरात टॅँकर सुरू आहे. पक्षांतर्गत विरोधाने ते हैराणपूर्वी त्यांना पक्षांतर्गत विरोध नव्हता. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे विकास कामावर बोलण्यासारखे काही नाही. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. ग्रामपंचायतीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा ठराव महासभेत तुमची सत्ता असताना का नाही केला असा सवाल जगताप यांनी केला. आमदारकी त्यांच्या एकट्याची आहे का? आमदारकीचे डोहाळे लागल्याचे सांगणाऱ्या राठोड यांच्या एकट्याची आमदारकी नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. प्रत्येकालाच आमदार व्हावे वाटते. कोणीही आमदारकीची निवडणूक लढवू शकतो असे सांगत जगताप यांनी डोहाळ्याच्या टीकेचे खंडण केले. त्यांना तेवढेच कामआरोप करणाऱ्यांना तेवढेच काम आहे. मला प्रलंबित विकास कामे करायची आहेत. काही संकल्पना राबवयाच्या असल्याचे ते म्हणाले.