शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत पुन्हा वाद नाही :अजित पवार यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:24 IST

आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल,असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

अहमदनगर : आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल, असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपवून पुण्याकडे जात असताना पवार यांनी सायंकाळी नगरमध्ये थांबून शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला़. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहराध्यक्ष माणिक विधाते, हमाल पंचायतचे अविनाश घुले, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी यावेळी उपस्थित होते़. अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जगात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. महागाई वाढत असताना पाच हजार कोटींच्या कर्जाची किमया सरकारने केली आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे, म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला आहे़.त्यादिशेने हालचाली सुरू आहेत. जिथे ज्या पक्षाची ताकद असेल, तिथे त्या पक्षाने उमेदवार द्यावा़ त्याला अन्य पक्षांनी सहकार्य करावे, असा जागा वाटपाचा फार्म्युला असेल.  यासंदर्भात दोन्ही पक्षांची मुंबईत बैठक आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा होईल.  आम्ही भारतीय आहोत, अशी ज्यांची भूमिका आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांवर आरोप केले गेले. दोन्ही काँग्रेसमध्ये वाद झाले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील आणि तसा विश्वास जनतेला देतील, असे पवार म्हणाले.दक्षिणेचा निर्णय चर्चेनेजागा वाटपाबाबत येत्या ६ व ७ आॅक्टोबर रोजी मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा होणार आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच दक्षिणेचा निर्णय होईल, परंतु, याबाबत माझ्यासह कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. स्थानिक नेत्यांनी पालिकेचा निर्णय घ्यावावरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल़ तो महापालिकेला लागू नसेल.  स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घ्यावा.  गरज असल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाईल असे पवार म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार