शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...तर विखेंचा मनसुबा उधळून लावणार; तनपुरे यांनी दर्शविली दक्षिणेतून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:39 IST

अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले आहेत.

राहुरी : अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले आहेत.गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्राजक्त तनपुरे यांनी हे विधान केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ़ उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढविली होती. निवडणुकीनंतर तनपुरे शिवसेनेत रमले नाहीत. त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँगे्रसशी सलगी वाढविली. नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर राहुरी मतदार संघात संपर्क वाढविला होता. त्यामुळे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. मात्र सोमवारी सायंकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यास स्वारस्य दाखविले आहे.प्राजक्त तनपुरे हे कोरी पाटी असून दक्षिणेत नातेवाईक व मित्रमंडळ आहे़ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना दक्षिणेत मतदारांनी साथ दिली होती. या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाल्यास यशस्वी होऊ शकतात, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा असून दक्षिणेत तरूण उमेदवार म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.डॉ. सुजय विखे हे भाजपमध्ये जातात की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपमध्ये विखे गेल्यास तनपुरे-विखे या दोन तरूण दादामध्ये लढत होऊ शकते. नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ राष्ट्रवादीने प्राजक्त तनपुरे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास विखे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागणार आहे, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे