शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

येत्या डिसेंबरमध्ये होणार उर्वरित ‘समृद्धी’ खुला; मुख्यमंत्री : दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:21 IST

- प्रमोद आहेर लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी (जि. अहमदनगर) : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला द्रुतगती मार्गाने जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या ...

- प्रमोद आहेरलोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी (जि. अहमदनगर) : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला द्रुतगती मार्गाने जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या डिसेंबरमध्ये उर्वरित समृद्धी मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल़. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीत टर्मिनल इमारतीच्या कामाचे भूमिपूजन जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत केली़

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील महामार्गावरील शिर्डी इंटरचेंज येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार हेमंत गोडसे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समृद्धीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १३ कृषी प्रकल्प साकार होणार आहेत. समृद्धीसोबत नागपूर ते गोंदिया हा महामार्ग प्रकल्प साकार होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक कॉरिडॉर ठरणार आहे. यामुळे १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामागार्मुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग