शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

५० टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य विभागच विकलांग; कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओढाताण

By चंद्रकांत शेळके | Updated: December 21, 2023 01:35 IST

२२९५ पैकी ११५५ पदे रिक्त

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: ग्रामीण भागाचे आरोग्य हे शासकीय आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून असल्याने ही यंत्रणा सक्षम असणे गरजेेचे आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाच विकलांग झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून त्यांचेच आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती आहे.

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ग्रामीण लोकसंख्येचे आरोग्य जपण्याचे काम करतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याद्वारे शासनाने ग्रामस्थांना थेट गावात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे, मात्र अपुऱ्या संख्याबळामुळे आहे त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. नोव्हेंबर २०२३ अखेर जि. प. आरोग्य विभागाची २२९५ पदे मंजूर आहेत. त्यातील ११४० पदे भरलेली असून तब्बल ११५५ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तीन पदे मंजूर आहेत ती सर्व रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची १४ पैकी ५ पदे रिक्त आहेत.

पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची २०७ पदे मंजूर आहेत. त्यातील ८८ रिक्त आहेत. गट ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १७ पैकी ३ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे उपकेंद्रांवर कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी नेमलेले आहेत. महिला आरोग्य सेविकांची ९९३ पदे मंजूर आहेत, त्यातील ५८३ रिक्त आहेत. पुरुष आरोग्य सेवकांची मंजूर ५७१ पैकी ३११ पदे रिक्त आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही तुटवडा

सध्या जिल्ह्यात ९९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५९६ उपकेंद्र सुरू आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वेळोवेळी वाढ होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत २० प्राथमिक आरोग्य केंद्रे व ११८ उपकेंद्रांचा तुटवडा आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार तर हा आकडा आणखी वाढेल. परंतु तेही शासन स्तरावर प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येतात. जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठवले गेले, मात्र अद्याप तरी यावर तोडगा निघालेला नाही.

पदभरतीत आरोग्यचीच पदे लटकली

शासनाने सध्या जिल्हा परिषदांच्या क गटातील पदभरती सुरू केलेली आहे. यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे ९३७ पदे भरायची असून यात ७२७ पदे केवळ आरोग्यचीच आहेत. यात इतर पदांसाठी परीक्षा झाली, मात्र अजून आरोग्याच्या पदांचे वेळापत्रकच जाहीर झालेले नाही. म्हणजे आरोग्य विभागाची साडेसाती येथेही संपलेली नाही.

टॅग्स :Healthआरोग्य