शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान

By शेखर पानसरे | Updated: May 13, 2023 16:16 IST

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे.

 - शेखर पानसरेसंगमनेर : कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात आणि राज्यात आता काँग्रेसच्या सरकारची गरज असून भाजपाची घसरण सुरू झाली. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शनिवारी (दि.१३) संगमनेरात जल्लोष करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा, एनएसयूआय तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, विश्वास मुर्तडक, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बालोडे आदी यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. २०१४ मध्ये भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून त्यामुळे समाजात समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिक अस्वस्थ आहेत. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा