शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

आंदोलनाची धग चौथ्या दिवशी कायम, रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By सुदाम देशमुख | Updated: March 8, 2024 12:25 IST

दरम्यान गुरुवारी रात्री तीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत दुसर्‍या दिवशी आमरण उपोषण चालूच ठेवले आहे. 

जामखेड (जि. अहमदनगर) : रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात तीन दिवसापासून विद्यार्थी शैक्षणिक, अर्थिक, शाररीक व मानसिक छळ होत असल्याने आंदोलन चालू होते. गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण घेत असलेल्या एका मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दरम्यान गुरुवारी रात्री तीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत दुसर्‍या दिवशी आमरण उपोषण चालूच ठेवले आहे.    रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या अन्याया विरोधात तीन दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवार पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी कर्जत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व इतर संघटनेच्या म्हणने ऐकून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शारीरिक, अर्थिक, माणसिक व शैक्षणिक छळ होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.        उपविभागीय अधिकारी नितीन पाटील व पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सदर बाब गंभीर असून याबाबत काय कारवाई झाली हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उपोषण व मुलींच्या तक्रारीसाठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली होती.      रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भास्कर मोरे यांनी फिर्यादीस  कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करतात. अश्लिल चाळे करतात. अशी फिर्याद दाखल केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.       रत्नदीप मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष यांच्या सह  सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.