शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:34 IST

अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनपा आयुक्तांनी १८ फेब्रुवारीपर्यंत पथदिवे चालू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, जॉय लोखंडे, मंगेश खताळ, लकी खुबचंदाणी, सॅम्युल खरात, भगवान आव्हाड, महेश कापरे, अमित औसरकर, अक्षय ससाणे, मळू गाडळकर, रोहित रासकर, संतोष ढाकणे, प्रशांत डहाळे, ओंकार ससाणे, महेश जाधव, किशोर पाटोळे आदी सहभागी झाले होते.कोठी ते यश पॅलेस या मार्गावर आनंदऋषीजी महाराज यांचे समाधी स्थळ, आनंदऋषीजी हॉस्पिटल, भाजी मार्केट, धान्य मार्केट, शाळा तसेच मोठी नागरी वस्ती आहे. या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. आनंदऋषीजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या या भागात राज्यासह देशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियमीत होत असल्याने या मार्गावर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची नेहमी वर्दळ असते़ या मार्गावर अनेकवेळा अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक नागरिकांचे मोबाईल, पैसे हिसकावणे तसेच जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर महापालिकेने पथदिवे लावले़ मात्र, ते अद्याप सुरुच झालेले नाहीत. तरीही पथदिवे बसविणाºया ठेकेदारास महापालिकेने बील अदा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे़ तातडीने या रस्त्यावरील पथदिवे चालू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस