शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:06 IST

केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे, टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

अहमदनगर : केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे.      काँग्रेसच्यावतीने गुरुवारी (दि. १५) सर्वत्र शेतकरी बचाओ व्हर्चुअल रॅली काढण्यात आली. संगमनेर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी चव्हाण बोलताना चव्हाण म्हणाले, पूर्वी देशात जमिनदार पद्धती होती. त्यातून सर्वसामान्यांचे शोषण केले जात होते. केंद्र सरकारने आता हीच शोषणाची पद्धत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायद्यातील त्रुटी सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शेतकरी देशोधडीला लावण्यासाठी कामदार कायदा मोदी सरकारने केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार नाही. शेतमालाचे भाव व्यापारी आणि उद्योगपती निश्चित करतील. तसेच कामगरांचे हक्कच कामदार कायद्याने हिरावून घेतले आहेत. कामगार कायदा आणून सरकारने उद्योजकांना सोयीचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

शेतकऱ्यांचा आधार हिरावला - थोरात

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी काँग्रेस सरकारने हमीभाव कायदा आणला होता. त्यातून शेतकऱ्यांना मोठा लाभ होत होता. म्हणूनच पंजाब, हरियाणासारख्या राज्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा हमीभावाचा आधारच केंद्र सरकारने हिरावून घेतला आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात