शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अटी, शर्तीत अडकल्या चारा छावण्या :पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:29 IST

दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत.

अहमदनगर : दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत. प्रशासन पक्षपातीपणे केवळ सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर करत आहे, असा आरोप जिल्ह्यात झाला आहे.जिल्ह्यात छावण्यांसाठी सहाशे अर्ज आले होते. त्यापैकी २२ अर्ज प्रशासनाने आतापर्यंत मंजूर केले आहेत. जे अर्ज मंजूर केले त्यास नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपशी जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना छावण्या वाटप करत आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी केला आहे.‘लोकमत’शी बोलताना मरकड म्हणाले, छावणीऐवजी दावणीला अनुदान द्या, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, प्रशासनाला छावण्याच हव्या आहेत. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे जनतेकडून देणगी मिळवून छावणी सुरु केली. तिच्यात दोनशे जनावरे आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: या छावणीला कोल्हापूर येथून एक लाख रुपयांचा चारा आणला.दरम्यानच्या काळात छावण्या सुरु करण्याचे धोरण सरकारने घेतले. आम्ही निकषात बसत असल्याने अर्ज केला. मात्र, प्रशासन आमच्या छावणीला अनुदान द्यायला तयार नाही. ज्यांनी अद्याप छावणीच सुरु केलेली नाही त्या संस्थांना मंजुरी मात्र, आम्ही छावणी चालवत असतानाही मंजुरी नाही. प्रशासन असे पक्षपातीपणे वागत आहे. छावण्यांची वाटप प्रक्रिया पारदर्शी नाही. छावण्यांसाठी आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी कशासाठी हव्या आहेत? तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे की त्यांना लाचार बनवून नेत्यांच्या व अधिका-यांच्या दारात उभे करायचे आहे, असा थेट प्रश्न मरकड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.काय आहेत किचकट अटी ?शासनाने महिनाभरापूर्वी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी अटी-शर्तींचीच मोठी यादी आहे. एका छावणीत जास्तीत जास्त ५०० जनावरे दाखल करता येतील, अशी अट आहे. गावात ५०० पेक्षा जास्त जनावरे असतील तर गावात दुसरी छावणी मंजूर करता येईल की नाही? याबाबतचा उल्लेख शासन आदेशात नाही. एकाच गावातून अनेक प्रस्ताव असल्याने गोंधळ उडाला आहे.छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले आहेत. पालकमंत्री यासाठी आमदारांची शिफारस मागत आहेत. केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. छावणी सुरु करण्यासाठी सदर संस्थेकडे दहा लाख रुपये रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.अडीच महिनेच छावण्यादुष्काळाचा एक महिना तर सरला आहे. अजून तीन महिने दुष्काळाची तीव्रता जाणवेल. मे महिन्याच्या मध्यापासूनच शेतकरी मशागतीची कामे करतात. त्यासाठी ते छावणीतून जनावरे घेऊन जातात. त्यामुळे मार्चपासून छावण्या सुरू झाल्या तर पुढे अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी उरतो. मागील सरकारने सहा-सात महिने छावण्या चालवल्या, या सरकारला दोन-तीन महिनेच छावण्या चालवायच्या आहेत. परंतु त्याही अद्याप सुरू होईनात, अशी तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेतअडीच लाख मेट्रिक टन चा-याची गरजगेल्या १६ महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नाही. जिल्ह्यात सुमारे २८ लाख लहान-मोठी जनावरे असून त्यांना महिन्याकाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची गरज भासते. प्रशासनाने चारा टंचाईवर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करणे आव्हान आहे. दुसरीकडे चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे.पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यातनिवडुंगे (ता़ पाथर्डी) येथे शरद मरकड व शेतक-यांनी सुरु केलेल्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे मंजुरी देत नाहीत, याच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी सकाळी आत्मदहन करणार आहेत, असा इशारा देवीदास खेडकर यांनी दिला आहे़ त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली़ पोलिसांनी रात्री शरद मरकड यांना ताब्यात घेतल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर