महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे ऑनलाइन खरीप पीक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, शेतकरी-शास्त्रज्ञ मंच ही विस्ताराची चांगली संकल्पना असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा चांगला समन्वय झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे सुलभ होईल. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या ज्वलंत समस्या जसे की, उसावरील लोकरी मावा, हुमणी व इतर पिकांवरील रोग किडींबाबत त्वरित मार्गदर्शन करावे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.मिलिंद देशमुख यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, डॉ.नंदकुमार कुटे यांनी तूर उत्पादन तंत्रज्ञान, डॉ.राजेंद्र वाघ यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान आणि डॉ.विनायक जोशी यांनी खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.पंडित खर्डे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.भगवान देशमुख यांनी केले, तर आभार डॉ.सुनील अडांगळे यांनी मानले. या बैठकीच्या आयोजनासाठी प्रा.अन्सार आत्तार, डॉ.सुनील अडांगळे आणि रोहित उघडे यांनी परिश्रम घेतले.