शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथील द्वारकामाईत साईबाबा प्रकटल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:42 IST

द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याची चर्चा बुधवारी मध्यरात्री शिर्डीत पसरली. आधी लोकांमध्ये असलेली ही चर्चा नंतर सोशल मीडियावरून थेट जगातील साईभक्तांपर्यंत पोहोचली. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती.

शिर्डी : येथील द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याची चर्चा बुधवारी मध्यरात्री शिर्डीत पसरली. आधी लोकांमध्ये असलेली ही चर्चा नंतर सोशल मीडियावरून थेट जगातील साईभक्तांपर्यंत पोहोचली. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्याही नाकीनऊ आले.साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडले. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजवर या मंदिरात अनेकदा चमत्कार म्हणाव्या, अशा घटना घडल्याचे सांगितले जाते. बुधवारी मध्यरात्री गुरूवारचा शुभारंभ होताना द्वारकामाईतील कोपऱ्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याची चर्चा सुरू झाली. हा कोपरा बाबांच्या हयातीपासून आहे. या कोपºयात बाबा दिवा लावत होते. आजही या कोप-याला पुजारी रोज हार घालतात. नेमके याच ठिकाणी बाबांचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाल्याने उत्सुकतेपोटी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. यापूर्वीही येथे सार्इंची प्रतिमा दिसल्याचे सांगितले जाते. याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. यानंतर काही क्षणातच द्वारकामाई परिसर भाविकांनी खचाखच भरून गेला. गर्दी नियंत्रणात आणताना सुरक्षा रक्षकांना नाकीनऊ आले. साईनामाने अवधी साईनगरी भल्या मध्यरात्री दुमदुमली होती. अनेकांनी या दृश्याचे चित्रीकरण केले. छायाचित्रे काढली. काही क्षणातच ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली. गुरूवारी सकाळपर्यंत जगभरातील लाखो भाविकांपर्यत ही घटना पोहोचली. सकाळीही द्वारकामाईत नेहमीपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्इंच्या या प्रतिमेचे दर्शन बुधवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा असे तासभर घडले. त्यानंतर ही प्रतिमा विरळ होत नाहीशी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष सुरू असून शेवटचे शंभर दिवस शिल्लक आहेत. याच काळात ही घटना घडल्याने आगामी काळात भाविकांचा ओघ वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :saibabaसाईबाबाAhmednagarअहमदनगरshirdiशिर्डी