शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी जलसेनच्या थालीपीठाची पुणे-मुंबईकरांना गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:04 IST

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे.

विनोद गोळे । 

पारनेर : तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे.

पिंपरी जलसेन गावात महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व गीतांजली शेळके यांनी ग्रामस्थांना एकत्र करून जलसंधारण चळवळ राबविली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव राज्यात दुसरे आले. याच धर्तीवर गीतांजली शेळके यांनी महिला, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला. अनेकांशी चर्चा केली. त्यातून ग्रामीण महिलांना सोपे ठरणारे आणि यातून उद्योगाला चालना देणारे आहारात पौष्टिक असणाºया थालीपीठासाठी लागणारे ‘पीठ’ तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येकी पाचशे रूपये भांडवलात सुरू झाला उद्योग..गीतांजली शेळके यांनी महिलांना थालीपीठासाठीचे पीठ बनविण्याच्या प्रयोगाबाबत माहिती दिली. त्यांनी थालीपीठ खाताना स्वादिष्ट होण्यासाठी आई रोहिणी माधव देशमुख यांच्याकडून पीठ बनविताना काय-काय पदार्थ कशा पद्धतीने टाकायचे याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वत: महिलांना प्रशिक्षण दिले. मग नवलाई बचत गटाच्या प्रतिभा बोरुडे, राहत पठाण, सोनाली पुणेकर, प्रवीण गायकवाड, वंदना वाढवणे, वृषाली काळे, सविता शिंदे, शबाना शेख, अंजली गाडेकर, सुनीता थोरात, रतन सोनवणे यांनी प्रत्येकी ५०० रूपये जमा करून थालीपीठचे पीठ बनविण्यासाठी धान्य व विविध वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर प्रत्यक्ष पीठ बनविणे सुरू केले. शेळके यांनी प्राथमिक स्तरावर याची पाकिटे पुण्या-मुंबईत दिली. त्याची विक्री होऊन मागणी वाढली. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती सुरू केली. 

थालीपीठ पौष्टिक आहार आहे. त्याचे पीठ बनवून विक्री करणे सोपे आहे. त्यामुळे महिला, युवक, युवतींनी राज्यात चौका-चौकात असे थालीपीठ स्टॉल सुरू करावे, असा आमचा प्रयत्न आहे. वडापाव, इडली-डोसा विक्रीच्या धर्तीवर या माध्यमातून राज्यात हजारो जणांना यातून रोजगार मिळेल.-गीतांजली शेळके, प्रमुख, थालीपीठ उद्योग केंद्र

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरSocialसामाजिक