शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बीड रस्त्यावर तरूणाचा हवेत गोळीबार, आरोपी फरार एक संशयित ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 14:23 IST

एका युवकाने हवेत गोळीबार केला यामध्ये सुदैवाने जीवीत हानी झाली नाही

जामखेड - शहरातील बीड रोडवर जुन्या वादातून अठवडी बाजारा दिवशीच सकाळी दहा वाजता भरदिवसा एकाने हवेत गोळीबार केला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन एका संशयितास ताब्यात घेतले आहे. जामखेड शहराचा आठवडी बाजार शनिवारचा या बाजार दिवशीच एका कापड दुकाना समोर जुन्या वादातून हा गोळीबार झाला आसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित आरोपीचे आणि समोरील गटाचे वाद निर्माण झाला होता. हा वाद शनिवार दि २९ रोजी अठवडी बाजार दिवशीच पुन्हा उफाळून आला.

एका युवकाने हवेत गोळीबार केला यामध्ये सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह गोळीबार झाला त्या ठिकाणी भेट दिली. या वेळी बघ्याची एकच गर्दी जमली होती. गोळीबार झालेला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असुन त्या दुष्टीने पोलीस तपास करीत आहे.  या प्रकरणी पोलीसांनी एका संशयितास माहितीसाठी ताब्यात घेतले आहे. गोळीबारामुळे परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याची नागरिकांमधून भीतीदायक चर्चा सुरू आहे. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. गेल्या दोन वर्षापुर्वी याच बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आसल्याने कायदासुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आसल्याचे चित्र दिसत आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरFiringगोळीबार