श्रीगोंदा (जि़ अहमदनगर) : सोशल मीडियावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी याप्रकरणी रविवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यात सर्वत्र मद्यविक्री बंद होती. मध्यंतरी राज्य सरकारने काही शहरांत व ग्रामीण भागात मद्यविक्रीला परवानगी दिली. त्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. या निर्णयानंतर विजय पवार याने फेसबुकवर खासदार सुळे यांचा फोटो टाकून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
सुप्रिया सुळेंची बदनामी, श्रीगोंद्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 06:48 IST