अहमदनगर : विकासकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सा़ बां़ अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला़ दरम्यान लेखी आश्वासनानंतर आ़ संग्राम जगताप यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली़शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले़ आंदोलनात शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, उपाध्यक्ष सारंग पंधाडे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, उमेश निस्ताने, माउली जाधव आदींचा सहभाग होता़ खोसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद महामार्गावरील कार्यालयात घुसून ठिय्या दिला़ कार्यालयात एकच गोंधळ उडाला़ सुरुवातीला अधिकारी उपस्थित नव्हते़ काहीवेळातच कार्यकारी अभियंता विभुते व उपभियंता देवकुळे अधीक्षक अभियंत्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या दालनात आले़ त्यांना कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले़ सहाय्यकांच्या दालतानून ते बाहेर आले नाहीत़ त्यामुळे संतप्त कार्यकर्ते दरवाजा उघडून आत गेले़ तेथे अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़ पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़ अखेर रस्त्यावर चर्चा करण्याच्या अटीवर कार्यकर्ते बाहेर आले़ पोलीस बंदोबस्तात अधिकारी रस्त्यावर आले़ तेथेही कार्यकर्त्यांनी आधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले़ दरम्यान आमदार जगताप आंदोलनस्थळी दाखल झाले़ जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनासमोर पुन्हा ठिय्या दिला़ नगरसेवक अविनाश घुले, विपुल शेटीया, विजय गव्हाळे, कुमार वाकळे, संपत बारस्कर हे फरशीवर बसले़ घुले यांच्यासह खोसे चर्चेसाठी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात गेले़ अधीक्षक अभियंता भोसले यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आठ दिवसांत ५० टक्के काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन जगताप यांना दिले़ लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले़(प्रतिनिधी)येत्या पंधरा दिवसांत ही सर्व कामे पूर्ण न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल़ ही कामे पूर्ण करावी, अन्यथा अधीक्षक अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना कार्यालयात बसून देणार नाही, याची दखल घेऊन तत्काळ कामे करावीत़-आ़ संग्राम जगताप
अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 8, 2016 23:34 IST