शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बनले साखरेचे आगार : अहमदनगरची मक्तेदारी मोडली

By मिलिंदकुमार साळवे | Updated: October 27, 2018 11:42 IST

मिलिंदकुमार साळवे अहमदनगर : राज्यात व देशात एकेकाळी साखरेची आगार अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता ...

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यात व देशात एकेकाळी साखरेची आगार अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता ही अहमदनगरची साखर धंद्यातील मक्तेदारी मोडीत काढून सोलापूर जिल्हा साखरेचे आगार बनले आहे.आशिया खंडातील व भारतातील पहिला खासगी ब्रॅडी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथे सुरू झाला होता. त्याच अहमदनगर जिल्ह्यात पुढे भारतातील सहकारी तत्वावरील पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना सुरू झाला. नंतर दिवंगत अण्णासाहेब शिंदे केंद्रीय शेती मंत्री असताना अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी व खासगी कारखाने सुरू झाले. पुढे हा जिल्हा साखरेचे आगारच बनले. पण आता साखरेचे आगार अशी अहमदनगरची ओळख पुसली गेली आहे. राज्याचे सहकारमंत्री पद भूषविणाऱ्या सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यास मागे सारत सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच सोलापूर आता साखरेचे नवे आगार निर्माण झाले आहे.देशमुख यांचे स्वत:चे दोन खासगी कारखाने आहेत. साखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात राज्यात १८८ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील २२, पुणे जिल्ह्यातील १७, सातारा जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर मराठवाडा विभागात उस्मानाबादचा पहिला क्रमांक आहे. या जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक १०,‘मांजरा’ गाजविणा-या लातूर जिल्ह्यात ८ कारखाने आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात अवघे २ कारखाने आहेत.खासगीचा बोलबोलासाखरेचे नवे आगार बनलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांमध्ये निम्मे म्हणजे १६ कारखाने खासगी तत्त्वावरील आहेत. तर २२ कारखान्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात ८ कारखाने खासगी आहेत. साखर कारखानदारीवर पकड असणा-या पवारांच्या पुणे जिल्ह्यात ६ कारखाने खासगी आहेत.अहमदनगरचे कारखानेगस्ती, ज्ञानेश्वर, अशोक, पद्मश्री विखे, गणेश, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी, श्रीगोंदा, वृद्धेश्वर, कुकडी, केदारेश्वर, तनपुरे हे सहकारी कारखाने, तर पियुष, अंबालिका, गंगामाई, प्रसाद, जय श्रीराम, श्री क्रांती शुगर, साईकृपा १ व २, युटेक हे खासगी कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने