तालुकास्तरीय विविध गुणदर्शन ऑनलाईन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत स्टोरी टेलिंग स्पर्धेत सुयश साठे़, तर वक्तृत्व स्पर्धेत यशराज राहिंज याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिव्या कणगरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव अंतर्गत कर्तृत्ववान महिला वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक, मदर तेरेसा यांच्या भूमिकेला सुयश साठे प्रथम, तर सावित्रीबाई फुले वेशभूषेसाठी अनुज राहिंज याने द्वितीय क्रमांक मिळविला. राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत यशराज राहिंज याने नववा क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना ज्योती भोर, मंजूषा आवारी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिवजयंतीनिमित्त वाकोडी गावचे सरपंच हरिभाऊ कर्डीले यांनी गौरवचिन्ह देऊन सत्कार केला. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स ठेवून सर्व कार्यक्रम पार पडले.