शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या गोंगाटावर नाचताना विद्यार्थ्याचा मृत्यू? पुणतांबा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 05:44 IST

कृषी तंत्र विद्यालयात प्रकार, प्राचार्यांकडून खंडन

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पुणतांबा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचा निरोप समारंभातील डीजेच्या गोंगाटामुळे मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र डीजेचा आवाज नियंत्रणात होता व मृत्यूचे कारण वेगळे असू शकते, असा दावा केला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. 

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सुयोग कैलास अडसुरे (वय २०) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो पुणतांबा येथे विद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता.

प्राचार्यांनी फेटाळला दावाnप्राचार्य अविनाश गायकवाड यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप आग्रह केला. शेवटचे वर्ष असल्यानेडीजे लावण्याची मागणी केली.nमात्र, त्यावरील आवाज नियंत्रणात होता. घडलेलीघटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, मृत्यूचे कारण डीजेशी संबंधित नाही.

निरोप समारंभात लावला डीजे, आवाजाने छातीत झाला त्रास विद्यालयाची शुक्रवारपासून परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे निरोप समारंभामध्ये डीजे लावण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार गावातील एक डीजे तेथे लावण्यात आला.प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचे नाचगाणे सुरू झाले. याच वेळी सुयोग याला छातीत त्रास जाणवू लागला. त्याला पुणतांबा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सुयोग याला मृत घोषित करण्यात आले.