निवेदनात राठोड यांनी म्हटले आहे, नगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती खूपच भयावह होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्याही लक्षणीय आहे. रुग्णांना वेळेवर बेड न मिळणे, ऑक्सिजन संपलेला असणे , व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे, रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर न मिळणे ही त्यामागची मुख्य कारणे आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंट्रोलरूम सुरू केली आहे. मात्र, या कंट्रोल रूमचा फोन वेळेवर उचलला जात नाही. सध्या कोठे बेड उपलब्ध आहे, व्हेंटिलेटर मिळेल का, याची माहिती ऑनलाईन वेबसाईटवर दिली जात नाही. रेमडेसिविर इंजेक्शन चेहरा पाहून दिले जाते आहे. त्याचे वितरण करताना राजकीय हस्तक्षेप करण्यात येत आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे वितरण करतानाही दुजाभाव केला जात आहे. असा आरोप करत या परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी राठोड यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
रेमडेसिविर वितरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST