शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर जामखेडमध्ये शिवसेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:19 IST

हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथे सुरू करावे, कुकडीचे पाणी, तालुक्यातील प्रभारी राज यासह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जामखेड : हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथे सुरू करावे, कुकडीचे पाणी, तालुक्यातील प्रभारी राज यासह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.येथील खर्डा चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको आंदोलन दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले म्हणाले, जामखेड हे तालुक्याचे व दळणवळणासाठी सोयीचे ठिकाण असताना शेवटच्या टोकावर असलेल्या खर्डा येथे हरभरा खरेदी केंद्र मर्जीतील कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी सुरू केले. आमचा खर्डा खरेदी केंद्राला विरोध नाही़ पण जामखेड येथेही खरेदी केंद्र सुरू करावयास पाहिजे होते. भूम, परांडा, बार्शी येथील व्यापा-यांचा हरभरा घेण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी खर्डा येथे कार्यकर्त्यांना केंद्र दिला अल्याचा आरोप शहाजीराजे भोसले यांनी केला.तालुक्यातील प्रमुख कार्यालयात तहसील, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, जि. प. बांधकाम व पाणीपुरवठा अशी महत्वाची पदे आठ महिन्यांपासून रिक्त असून पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भितीपोटी कोणी अधिकारी येथे यायला तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढल्यानंतर जिल्हा परिषद गेस्ट हाऊस, पंचायत समिती कार्यालयासमोर व बसस्थानक परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून तेथे अतिक्रमण धारकांना प्राधान्याने गाळे द्यावे, शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करावा, बाजार समितीच्या आवारातील बैलबाजार जागेत पदाधिका-यांनी भूखंडाचे अनधिकृत वाटप केले. याची चौकशी करावी व निविदा काढून वाटप करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास जाधव, शिवसेना नेते लक्ष्मण कानडे यांनी भाषणे केली. यावेळी शिवसेना नेते अंकुशराव उगले, तालुका उपप्रमुख संतोष वाळुजकर, मोहन जाधव, दत्ता शिंदे, संदिप भोरे, राहुल उगले, राजू पाचारे, हर्षल मुळे आदी शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे चारही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड