शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर पेटला डंपर; एकाचा होरपळून मृत्यू; नगर-औरंगाबाद रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:30 IST

खासगी व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले.

नेवासा : खासगी व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथे रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपरला आग लागली होती.नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कामानीजवळ नगरकडून औरंगाबादकडे जाणाºया खासगी बसने (क्रमांक जी.जे.-१४, झेड-८५८५) डंपरला (विना नंबर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरची डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला. दरम्यान डंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय २७, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हा या अपघातात डंपरमध्येच जळून मयत झाला आहे. तर  डंपर चालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर  खासगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर वाहतूक ठप्पअपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस नाईक बबन तमनर व पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. मयत पांडुरंग गायकवाड याचा भाऊ शहादेव रामकिसन गायकवाड याने खासगी चालकाविरुद्ध नेवासा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातNevasaनेवासा