शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गल्लोगल्ली आली आहे  स्वस्तात मरणाची ‘झिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:26 IST

सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत.

मच्छिंद्र देशमुखकोतुळ (जि. अहमदनगर) : सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत. पानटपरीवर सहज दहा वीस रुपयांत ही पेये मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला, पुरुषही या ड्रिंक्सच्या आहारी गेले आहेत.

सहज व कमी पैशात हे पेय मिळत असल्याने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेत आहेत. वाहन चालकही मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत. याचे सेवन केल्यानंतर झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बऱ्यापैकी गुंगी येते. 

२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे. शिवाय लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद त्यावर आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.ली.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र, या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत. दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ, नये असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले तरीही ही  पेये सहज उपलब्ध होत आहेत. 

कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागते.- डॉ. जगदीश वाबळे, एम. डी. मेडिसीन, संगमनेर

कॅफेनयुक्त थंड पेये आढळून आलेली नाहीत. एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेन असते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर