अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेतील विविध नागरी प्रश्नांबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना रविवारी दिले. यावेळी संपत बेरड, अभिजित सपकाळ, मच्छिंद्र बेरड, शुभम भंडारी, सुदाम गांधले, आदी उपस्थित होते. भिंगारला एमआयडीसीमार्फत एमईएसला व एमईएसमार्फत छावणी परिषदेला पाणी मिळते. त्यानंतर बोर्डामार्फत नागरिकांना पाणी दिले जाते. हा पाणीपुरवठा औद्योगिक दराने केला जात असून, त्याचे दर चार ते पाचपट अधिक आहे. भिंगारकरांना घरगुती पाणीपुरवठा दराने पाणी मिळण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित करून शहराच्या फेज टू मधून किंवा चाळीस गावच्या बुऱ्हाणनगर योजनेतून पाणी मिळावे, छावणी परिषदेला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा द्यावा, आदी मागण्या त्यांनी निवेदनात केल्या आहेत.
भिंगार छावणी परिषदेच्या प्रश्नांबाबत शरद पवारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST