शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीत पार पडणार राज्यस्तरीय सरपंच परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 09:42 IST

परिषदेला २५ हजार सरपंच उपस्थित राहणार

शिर्डी : शिर्डी येथे ३१ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान एक दिवसीय सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास राज्यमंत्री विजय शिवतारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील २५ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. 

कोऱ्हाळे (ता.राहाता) येथे १५ हेक्टर क्षेत्रामध्ये वनविभागातर्फे ३७ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या परिसराला ‘सरपंच वाटिका’ असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या मालकीच्या मौजे निमगाव कोऱ्हाळे शिवारात पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. गावठाणांचा ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभराज्यातील नगर भूमापन योजना लागू नसलेल्या सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करुन घेण्यासह गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फ त ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस