श्रीगोंदा : कोरोना महामारीमुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व छोटे भाजीपाला विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. असे म्हणत बहुजन मुक्ती पक्षाच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बुधवारी सकाळी भाजीपाला फेकून राज्य सरकारचा निषेध नाेंदविण्यात आला.
लॉकडाऊनमुळे शेतकरी, किरकोळ विक्रेते यांच्यावर मोठे संकट आले आहे. त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. सर्वसामान्य शेतकरी व किरकोळ विक्रेते यांच्यावर मात्र बेकारीची, उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजीपाला फेकून निषेध नोंदविला असल्याचे बहुजन मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष समीर शिंदे, शहराध्यक्ष सुभाष बोराडे, कालिदास सावंत, दादा शिंदे, रामदास मले, सुनील काकडे, तानाजी सावंत, सुभाष सावंत, सुरेश रणनवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.