शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांडाला राठोडांकडून राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 12:39 IST

केडगाव हत्याकांडाला माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा खळबळजनक अहवालराजकीय स्वार्थासाठी राठोड टोकाची भूमिकाही घेतील

अहमदनगर : केडगाव हत्याकांडाला माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेला शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय रंग दिला जात आहे. शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी नि:पक्षपातीपणे तपास करणाऱ्या यंत्रणेवरच संशय घेतला जात आहे. त्यामुळे केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा अहवाल चक्क जिल्हा पोलीस प्रशासनाने गृहविभागाकडे पाठविला आहे़ त्यामुळे राठोड अडचणीत सापडले आहेत. केडगाव हत्याकांडाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग करण्यासंदर्भात पोलिसांनी १४ मे रोजी पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठविला होता. हा अहवाल गेल्यानंतर दुसºयाच दिवशी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासंदर्भात आदेश काढण्यात आला. पोलिसांनी या अहवालात हत्याकांड घडल्यानंतर अनिल राठोड यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक खेडकर व शिवसेनेची महिला आघाडीची कार्यकर्ता, शिवसेना शहर प्रमुख यांच्या राजकीय हस्तक्षेपाची यादीच सादर केली आहे. शिवसैनिकांना अटक सुरु होताच मयत ठुबे व कोतकर कुटुंबीयांना उपोषण करण्यासाठी राठोड यांनी प्रोत्साहन दिले. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास जिल्ह्यात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व परिस्थितीत अनिल राठोड, खेडकर हे गंभीर परिस्थिती व अडचणी निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत. राजकीय स्वार्थासाठी राठोड हे भयंकर प्रयत्नशील असून, ते टोकाची भूमिका घेण्यासही कचरणार नाहीत, अशी शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी व मयतांच्या कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे हत्येचा तपास सीआयडीकडे द्यावा, असे या अहवालात म्हटले आहे.स्थानिक शिवसेना पोलिसांबाबत पूर्वग्रहदूषितस्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते नगर शहर पोलिसांबाबत पूर्वग्रहदूषित आहेत़ केडगाव येथील तोडफोडीच्या गुन्ह्यात शिवसैनिकांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी दबाव निर्माण करत आहेत, असे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. अखेर राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून पोलिसांनी हा तपास सीआयडीकडे देण्याची विनंती केली. हा तपास सीआयडीकडे गेल्याने नेमका काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शिवसैनिकांना अटक होताच दबावतंत्रकेडगाव येथे ७ एप्रिल रोजी महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून सेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. या घटनेच्या अनुषंगाने एकूण तीन गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्यात शिवसेनेचे नेते व पदाधिकारी आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यास सुरूवात केल्यानंतर या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड