शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
2
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
3
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
4
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
5
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
6
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
7
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
8
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
10
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
11
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
12
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
13
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
14
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
15
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
16
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
17
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
18
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
19
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
20
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."

आजपासून अकरावीचे प्रवेश सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 10:47 IST

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदानित तुकड्यांत प्रवेश मिळेल, असा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.

अहमदनगर : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदानित तुकड्यांत प्रवेश मिळेल, असा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.येथील न्यू आर्टस महाविद्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण अधिकारी लक्ष्मण पोले यांनी जाहीर केले आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या अर्ज वाटपास कनिष्ठ महाविद्यालयांत प्रारंभ झाला आहे. शहरासह जिल्ह्यांत अकरावी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या ७५२ तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रवेश क्षमता ६७ हजार २२१ एवढी आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना आधी विना अनुदानित आणि नंतर अनुदानित तुकड्यांतील जागा भरल्या जात असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार अनुदानित तुकड्यांची प्रवेश प्रक्रिया प्रथम राबविणे सक्तीचे करण्यात आले आहे. माध्यमिक शाळेशी संलग्न, उच्च माध्यमिक वर्ग, स्वतंत्र उच्च माध्यमिक विद्यालय आणि स्वयं अर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या ८० इतकी आहे. वरिष्ठ महाविद्यालयाशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना मात्र १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुभा आहे. अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांच्या एकूण तीन गुणवत्ता याद्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रसिध्द केल्या जाणार आहे. तिनही गुणवत्ता याद्या प्रसिध्द होईपर्यंत विद्यार्थ्यांना थांबावे लागेल़ अनुदानित तुकडीत प्रवेश न मिळाल्यास सर्वात शेवटी विना अनुदानित तुकड्यांची यादी प्रसिध्द होईल.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशअनुसूचित जाती.................. १३ टक्केएसटी अनुसूचित जमाती........ ७ टक्केओबीसी........................... १९ टक्केनागरिकांचा मागास प्रवर्ग......... २ टक्केएनटी (अ).......................... ३ टक्केएनटी(ब).................. २़५ टक्केएनटी (क)...................... ३़५ टक्केएनटी (ड)..................... २ टक्के़काय आहे नियममाध्यमिक शाळा असल्यास २० टक्केस्वातंत्र्य सैनिक व बदली पालक- ५ टक्केक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील कामगिरी करणाऱ्यांसाठी ५ टक्केअपंगांसाठी ३ टक्के जागाअनुदानित अकरावीसाठी ३९५ तर बारावीसाठी ४१० शुल्कअनुदानित कॉलेजांमध्ये साधारणपणे अकरावीसाठी ३९५ रुपये, तर बारावीसाठी ४१० रुपये शुल्क आकारण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विनाअनुदानित तत्त्वावरील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी सरकार निर्णयाप्रमाणे शुल्क निश्चित करून आकारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अकरावी प्रवेशाचे अंतिम वेळापत्रकप्रवेश अर्ज वाटप व स्वीकृती................................ १३ ते १७ जूनप्राप्त सर्व अर्जांचे संगणकीकरण......................... १८ जूनसर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे...... १९ जूनप्राथमिक गुणवत्ता यादीवर आक्षेप मागविणे.................... २० व २१ जूनसर्व विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे........... २२ जूनगुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश देणे................................ २३ ते २५ जूनप्रतीक्षा यादी क्रमांक - १ जाहीर करणे.................... २६ जूनप्रतीक्षा यादी क्रमांक - १ प्रमाणे प्रवेश.................... २७ व २८ जूनप्रतीक्षा यादी क्रमांक - २ जाहीर करणे........................ २९ जूनप्रतीक्षा यादी क्रमांक - २ प्रमाणे प्रवेश................... ३० जून ते २ जुलैप्रतीक्षा यादी क्रमांक ३ जाहीर करणे............................. ३ जुलैप्रतीक्षा यादी क्रमांक ३ प्रमाणे प्रवेश............................ ५ व ६ जुलैविनाअनुदानित तुकड्यांची यादी जाहीर करणे व प्रवेश देणे... ७ ते ११ जुलैअकरावीचे वर्ग सुरू............................................... १२ जुलै

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद