शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बंद सिग्नल सुरू करा; अन्यथा आयुक्तांचीच गाडी अडवू: काँग्रेसचा इशारा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 26, 2023 14:27 IST

काँग्रेसच्यावतीने या मागणीबाबत महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले.

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथील बंद असलेले सिग्नल सुरू करावेत. अन्यथा आयुक्तांची गाडी या चौकात अडविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

काँग्रेसच्यावतीने या मागणीबाबत महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. तसेच आयुक्तांना गुलाब पुष्पगुच्छ भेट देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या वाहतूक नियंत्रण केले जाते. मात्र वाहतुकीचे योग्य प्रकारे संचलन होण्यास अडथळा निर्माण होऊन अनेकदा ट्राफिक जाम होते. मनपा कार्यालया जवळ असणारा सिग्नलच बंद असून देखील मनपा झोपलेली आहे. तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयां जवळ असणारा सिग्नल बंद आहे. आयुक्त सुस्त असल्यामुळे सिग्नल बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीकडे आयुक्तांचे लक्ष नाही. नागरी प्रश्नांबद्दलच्या ते असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसAhmednagarअहमदनगर