शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:21 IST

माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली.

शेवगाव : माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली. बालमटाकळी सज्जाचे तलाठी बाबासाहेब जगन्नाथ अंधारे यांनी याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सुभाष सोनवणे (रा.पारगाव घोगस, ता.शिरूर,जि.बीड) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अंधारे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुभाष सोनावणे कार्यालयात आले. माझे आजोबा काशिनाथ दगडू सोनावणे यांनी बक्षिसपत्र केलेल्या माझ्या नोंदीवर कोणी हरकत घेतली आहे. याची मला तक्रार दाखवा..असे म्हणाले. मी त्यांना तक्रार दाखविली. यावेळी त्यांनी सदर तक्रारीची कॉपी मला मागितली. मी त्यांना रितसर अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला कॉपी देतो.. असे सांगितले. याचा त्यांना राग आला. त्यांनी  माझ्या शासकीय कामात अडथळा केला. मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. असे  फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पावरा हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सोनावणे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. .....

टॅग्स :ahmedabadअहमदाबादShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारी