कोपरगाव : डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला कोपरगाव तालुक्यातील डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती कोपरगाव इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर जोर्वेकर, सचिव डॉ. मयूर तिरमखे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेत सर्व दवाखाने, बाह्यरुग्ण विभाग आपत्कालीन सेवावगळता बंद पाळण्यात आला. केंद्र सरकार लागू करू इच्छित असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी ७५ डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला, तसेच विविध मागण्यांचे निवेदनही नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले.
शस्त्रक्रियेला संस्कृत नावे देणे दिशाभूल करणारे आहे आणि त्यात तथ्य नाही. सीसीआयएमने आयुर्वेद अभ्यासक्रमात या शस्त्रक्रियांचा समावेश आधुनिक वैद्यकीय शाखेत नियमन करताना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी न घेता केला आहे. आयुर्वेदात या पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये एमएस (मास्टर ऑफ सर्जरी) पदवी देण्यात येईल. यामुळे सामान्य जनता आणि रुग्णांची दिशाभूल होईल. यापैकी बहुतेक ५८ शस्त्रक्रिया या सुपर विशेषज्ञ सर्जनने केल्या आहेत. ज्यासाठी तो एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून सुमारे ८ वर्षांचा वास्तविक अनुभव आणि त्याचा अभ्यास करीत असतो. त्यानंतरही तो अद्ययावत अभ्यास करीत राहतो. हे विषय आयुर्वेदाच्या बीएएमएस अभ्यासक्रमात शिकविले जात नाहीत, म्हणूनच रुग्णांवर अर्ध्या धोक्याच्या ज्ञानाने शस्त्रक्रिया केल्या गेल्या तर ते त्रासदायक ठरते. म्हणून आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना अशी परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी कोपरगाव तालुका इंडियन मेडिकल असोसिशनचे अध्यक्ष डॉ. मयूर जोर्वेकर, सचिव डॉ. मयूर तिरमखे, तसेच डॉ. संदीप मुरूमकर, डॉ. भगवान शिंदे, डॉ. संजय उंबरकर, डॉ. योगेश लाडे, डॉ. अप्पासाहेब आदिक, डॉ. शंतनू सरवार, डॉ. योगेश बनकर, डॉ. सचिन उंडे, डॉ. अमोल अजमेरे उपस्थित होते.
....................
फोटो११- कोपरगाव निवेदन
111220\img-20201211-wa0024.jpg
कोपरगाव येथील इंडियन मेडिकल असोशिएशनच्यावतीने नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले.