शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

अध्यात्म : स्वत:ला जाणणं हेच खरे अध्यात्म: अशोकानंद कर्डिले महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 13:05 IST

मानवाने स्वत:ला जाणले पाहिजे हाच खरा परमार्थ आहे. अध्यात्म वेगळे आणि धर्म वेगळा आहे.  धर्म नीती नियम, विहित निषिद्ध काय आहे?याची शिकवण देतो, पण अध्यात्म मात्र ‘तू कोण आहेस हे शिकवितो. आत्म्याचे यथार्थ रूप अध्यात्म शिकविते. तू कोठून आलास, तुला कोठे जायचे आहे? हे अध्यात्म शिकविते.

भज गोविंदम-१०

  का ते कांता कस्ते पुत्र:, संसारो यमतीव विचित्र:   कास्य त्वं क: कुत आयात: तत्वं चिन्तय तदिह भ्राते- १०

कोण तुझी पत्नी ? कोण तुझा मुलगा? तू कोणाचा आहेस? तू कोण आहेस, ? तू कोठून आलास ? हा संसार अतिशय विचित्र आहे. हे बंधो ! यामधील सत्याचा विचार कर. तोही येथेच कर ...    

   मानव हा समूहप्रिय प्राणी आहे. यातूनच कुटुंब संस्था उदयाला आली आहे. एका दृष्टीने ते चांगले आहे. कारण मानव हा काही इतर पशुप्रमाणे नाही. त्याला बुद्धी आहे. वाणी आहे. चांगल्या वाईटाचा निर्णय करता येतो. नीती नियमाचे पालनही करता येते. माता-पिता बंधू-बहिण यातील ममत्त्व, नीती संबंध हे सर्व त्याला कळतात. त्याप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो.

या नात्यागोत्यामध्ये खरे हित कोणी सांगणारा आहे का ? फक्त आसक्ती असते ? हेही समजले पाहिजे.  हे सर्व नाते नि:संशय पवित्र असतात यात शंका नाही. पण आपल्याला मनुष्य जन्म कशाकरीता  मिळाला हे समजले पाहिजे. ‘नरादेहाचेनी ज्ञाने, सद्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावालोकाने दिधला  (नामदेव महाराज) मानवी देह मोक्षाकारीता मिळाला आहे. पण संसारात, नात्या-गोत्यात आसक्त होऊन  मनुष्यजन्माचे खरे कर्तव्यच विसरून गेला. त्यास वैराग्य व्हावे म्हणून भगवदपुज्यपाद  आद्य  श्री. शंकराचार्य स्वामी  त्या जीवाला सांगतात की, अरे !  तू ज्या संसारात माझे, माझे म्हणून रमातोस, तो संसार तुझा आहे का ? त्यामधील तुझी बायको शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे का ? विवाह संबंधाने तुम्ही एकत्र आला आहात. लग्नापूर्वी तुम्ही एकत्र होता काय ? तर नाही आणि दोघांपैकी कोणीतरी अगोदर हे जग सोडून जाणार आहे. त्यानंतर तुमचा संबंध असणार आहे का ? तर नाही. थोडक्यात संसार म्हणजे मानवाचे परीक्षास्थळ आहे. संयमाने आणि अनासक्तीने प्रपंच सुद्धा मुक्तीला कारण होऊ शकतो. पण तो अलिप्तपणे करता आला पाहिजे.

जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात,

जाणोनी नेणते करी माझे मन। तुझी प्रेमखूण देवोनिया॥ १॥ मग मी व्यवहारी असेन वर्तत।जेवी जळा आत पद्मपत्र॥२॥ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी। जैसा का उन्मनी योगीराज॥३॥देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी।स्वप्नीचिया सृष्टी चेइल्या जेवी॥४॥तुका म्हणे ऐसे झालीया वाचून। करणे तो शिण वाटतसे 

वरील अभंगात सांगितल्याप्रमाणे जर अनासक्त बुद्धीने संसारात राहिले तर मनुष्याचा उद्धार झाल्यावाचून राहत नाही. हे श्री. तुकाराम महाराजांनी उदाहरणासह पटवून दिले आहे आणि श्री शंकराचार्यांना देखील हेच म्हणावयाचे आहे. म्हणून ते सांगतात  की, बायको तुझा उद्धार करणार नाही. अपवाद वगळता (चुडाला राणी). पुत्राची व्याख्या  करतांना शास्त्र म्हणते पू नामक नरकातून जो तारतो, तो खरा पूत्र असतो. जो आई वडिलांची सेवा कतो, तो खरा पूत्र. पण हे सगळेच असे नसतात. उलट म्हातारपणी आई वडिलांना सोडून जाणारे पुष्कळ, त्यांना वृद्धाश्रामात ठेवणारे जास्त दिसतात. 

नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकाला रे, प्राण्या माझे माझे म्हणोनीअंतकाळी कोणीच वाचवायला येत नाही. उलट सगळे सोडून जातात. प्रसिद्ध उदाहरण गजेंद्र आहे. शेजीची कमिन दुरी राहे, हे तुकाराम महाराज सांगतात.  मानवाने स्वत:ला जाणले पाहिजे हाच खरा परमार्थ आहे. अध्यात्म वेगळे आणि धर्म वेगळा आहे.  धर्म नीती नियम, विहित निषिद्ध काय आहे?याची शिकवण देतो, पण अध्यात्म मात्र ‘तू कोण आहेस हे शिकवितो. आत्म्याचे यथार्थ रूप अध्यात्म शिकविते. तू कोठून आलास, तुला कोठे जायचे आहे? हे अध्यात्म शिकविते. म्हणून हे बंधो !  तू सार-असार याचा विचार कर, खरे काय खोटे काय याचा विचार कर. तोही या इहलोकीच आणि येथेच व आत्ता कर. तरच काही तरणोपाय होईल, अन्यथा अवघड आहे.  असे स्वामी विवेकानंद म्हणतात. स्वत:ला जाणणं हेच खरे अध्यात्म. -------------------------------------------------------------

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी(पाटील), ता. नगर मोबा.नंबर ९४२२२२०६०३ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक