शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्पिनर, लायटिंग, कार्टुन, डायमंड राख्यांचा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 12:47 IST

बहीण-भावांच्या नात्यांचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी बाजारात राख्या खरेदीसाठी महिलावर्गांनी मोठी गर्दी केली होती.

अहमदनगर : बहीण-भावांच्या नात्यांचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी बाजारात राख्या खरेदीसाठी महिलावर्गांनी मोठी गर्दी केली होती. यंदा बाजारात स्पिनर, कार्टुन, लायटिंगच्या आणि डायमंडची आकर्षक डिझायन असलेल्या राख्यांचा ट्रेंड दिसत आहे़लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या बाहुबली, डोरोमोन, छोटा भीम, पोकोमॅन व कार, बंदूकीच्या आकारातील छोट्या राख्यांनीही चांगलाच भाव खाल्ला आहे़ शहरातील कापडबाजार, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, टिळक रोड, बागडपट्टी, नवीपेठ, प्रोफेसर चौक, पाईपलाईन रोड आदी ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून राख्यांचे स्टॉल सजले आहेत़ व्यवसायिकांनी मुंबई, गुजरात, दिल्ली येथून या राख्यांची खरेदी केलेली आहे़ स्थानिक ठिकाणीही राख्या तयार करण्याचा व्यवसाय केला जातो़ या सर्व राख्यांमध्ये स्पिनर आणि लायटिंगच्या राख्या बच्चे कंपनींना सर्वाधिक आकर्षित करत आहेत़ ज्येष्ठ महिला डायमंड आणि पारंपरिक पद्धतीच्या राख्यांना पसंती देताना दिसत आहेत़ छोट्या आकाराच्या राख्यांना पाकिटात कुरिअरने सहज पाठविणे शक्य असल्याने अशा राख्याही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत़भावासाठी बहिणी जशा राख्या खरेदी करतना दिसल्या तसे भाऊही बहिणींसाठी बाजारात गिफ्ट खरेदी करताना दिसले़ त्यामुळे शनिवारी शहरात राख्यांचे स्टॉल आणि गिफ्टचे दुकाने हाऊसफूल्ल होती़ राख्यांना जीटएसटीच्या कक्षेतून वगळ्यात आल्याने दर जास्त काही वाढलेले दिसत नाही़ ५ रूपयांपासून ते ४०० रूपयांपर्यंत बाजारात राख्या उपलब्ध आहेत़ओवाळणीचे तबकही उपलब्धबाजारात आकर्षक राख्यांसोबत भावाला ओवाळण्यासाठी लागणारे सुबक तबकही विक्रीस उपलब्ध आहेत. या तबकात हळद-कुं कवाची लहान पाकिटे, अक्षता, गणपतीची मूर्ती आणि पेढा अशी सामग्री असलेले ताट महिलांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे़सोने-चांदीच्या राख्यांचीही खरेदीआर्थिक परिस्थितीनुसार काही महिला आपल्या भावासाठी खास सोने अथवा चांदीची राखी खरेदी करतात़ शहरातील विविध सराफ दुकानांमध्ये आकर्षक डिझाईनमध्ये अशा सोने व चांदीच्या राख्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत़राख्या खरेदीसाठी यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे़ नवनवीन आणि आकर्षक डिझाईन असलेल्या डायमंडच्या राख्यांना चांगली मागणी आहे़ लहान मुलींकडून कार्टुन, लायटिंग आणि स्पिनच्या राख्यांना मागणी आहे. -अमित बिल्ला, विक्रेते

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर