---------------
मारहाण करून चोरीचा प्रयत्न
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावाच्या शिवारातील दिवटे वस्ती येथे चोरट्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश करत मारहाण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ५ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी निखिल सुभाष दिवटे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक बोराडे पुढील तपास करत आहेत.
--------------
कंपनीतून चोरले पावणेतीन लाखांचे पत्रे
अहमदनगर : एमआयडीसी येथील इंडस्ट्रिज कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख ८१ हजार ५५० रुपयांचे ॲल्युमिनिअमचे पत्रे चोरून नेले. ४ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धीरज धनराज गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक पाठक पुढील तपास करत आहेत.
--------
ट्रेनिंग सेंटरमधील वस्तू चोरल्या
अहमदनगर : शहरातील नगर-औरंगाबाद रोडवरील सीक्युएव्ही परिसरातील ट्रेनिंग सेंटरमधील हॉलमध्ये घुसून चोरट्यांनी आठ हजार ५०० रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या. १ ते ४ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सत्यवीर रतनलालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गाडीलकर पुढील तपास करत आहेत.
-----------
एटीएम कार्ड चोरून लंपास केले १८ हजार
अहमदनगर : चोरट्याने घरातून एटीएम कार्ड चोरून त्यातील १८ हजार रुपये काढून घेतले. भिंगार येथे पाथर्डी रोडवरील साईप्रसाद रोहौसिंग येथे २१ डिसेंबर रोजी ही चोरी झाली होती. याप्रकरणी विजया बाळासाहेब गावखरे यांनी ५ जानेवारी रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल गोल्हार हे पुढील तपास करत आहेत.