शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:56 IST

पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला

घारगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही या वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे ही बस चर्चेत आहे.  पुण्याहून नाशिकला शनिवारी (२० मे) दुपारी सव्वा बारा वाजता प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसमधून संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात अचानक धूर निघू लागल्याने बसचालकाने जागेवरच बस थांबवली. प्रवाशांनीही भीतीपाेटी लागलीच बसमधून बाहेर पडण्यासाठी गर्दी करीत एकच पळापळ झाली.      पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. एम.एच. ०६ बी. डब्लू. ०६४९ या क्रमांकाची पिंपरी चिंचवड आगाराची ही शिवशाही बस होती. ही शिवशाही बस नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकला ४५ प्रवाशी घेऊन जात असताना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान आली असता याच वेळी बसच्या पुढील भागातून धूर निघून लागला. चालक आकाश अरविंद गायकवाड यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी जागीच थांबवली आणि आतील प्रवासी घाबरून बाहेर आले. यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांना बस पेट वगैरे घेते की काय अशी भीती वाटू लागली 

टॅग्स :Bus DriverबसचालकAhmednagarअहमदनगर