नगर तालुक्यात दुष्काळावर मात : जलयुक्तची कमाल, १८ गावांत १० कोटींची ८८५ कामेयोगेश गुंड ल्ल अहमदनगरगेली अनेक वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यात यावर्षी झालेल्या जलयुक्तच्या कामांची कमाल आता पावसाळ्यात दिसून येणार आहे. तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या जलयुक्त योजनेतून यावर्षी १८ गावांमध्ये जवळपास १० कोटींची कामे करण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील ५ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला तर तालुक्याचा दुष्काळाचा शाप जलयुक्तमुळे धुतला जाईल.गेल्या पाच वर्षांपासूनच्या सातत्याने येणाऱ्या दुष्काळजन्य स्थितीमुळे नगर तालुका मेटाकुटीला आला. पाण्याची तीव्र टंचाई, जनावरांच्या चाऱ्याची स्थिती,वन्य जीवांची पाण्यासाठी घालमेल यामुळे तालुक्यात टँकर आणि जनावरांसाठी छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत़ कधी नव्हे एवढी भीषण पाणीटंचाई तालुका गेल्या पाच वर्षांपासून अनुभवत आहे. या दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी प्रशासनाबरोबरच आता गावांनींही पुढाकार घेतल्याने तालुक्यातील प्रत्येक गाव हिवरे बाजारच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०१५-१६ या वर्षात तालुक्यातील १८ गावामध्ये जलयुक्त योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. अशी झाली कामे या योजनेतून कृषी विभागामार्फत तब्बल ८१७ कामे बांध बंधिस्ती करण्यात आली असून यासाठी ५ कोटी ३१ लाख खर्च करण्यात आले आहे.यामुळे तालुक्यात पाच हजार ४८२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वन विभागामार्फत समतल चराची ८ कामे करण्यात आली असून यामुळे २२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल या कामासाठी एक कोटी ५ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण मधून २० लाखांची ७ कामे करण्यात आली आहेत. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत सव्वा पाच लाखांची १९ कामे करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे मार्फत सिंचन नाला बांध करण्याची १३ कामे करण्यात आली असून यावर २ कोटी ६० लाख खर्च करण्यात आले आहेत,जि.प.मार्फत ६० लाखांची २१ कामे करण्यात आली आहेत. ओढा- नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, सिमेंट नाला यासारख्या कामांमुळे तालुक्यात गावांचे शिवार कमी खर्चात जलमय होईल़लोकसहभागाने ही केली किमया तालुक्यात काही गावांनी गाव टंचाई मुक्त करण्यासाठी पाणी अडवण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी लोकसहभाग आणि लोकवर्गणी जमा करून दुष्काळावर कायमची मात करण्यास ही गावे सरसावली आहेत. सारोळा कासार गावाने ४० लाख जमवून आतापर्यंत ९ कि.मी.नदी खोलीकरण आणि रुंदीकरण काम हाती घेतले आहे.अकोळनेर गावाने ३ कि.मी.खोलीकरण केले आहे.जाधववाडीने २ कि.मी.काम केले आहे.मजले चिंचोली गावानेही अडीच कि.मी. अंतराचे काम करून पाणी अडवण्याची किमया केली आहे.लोकसहभाग वाढत असल्याने अजूनही काही गावे पाणी अडवण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘जलयुक्त’ची कामे झालेली गावेचास, निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव,पारगाव भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडीपाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्दी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार,भोरवाडी, मांजरसुंबा, मदडगाव या गावांचा यात समावेश आहे.तालुक्याचा भौगोलिक विचार करून जलसंधारणची कामे करण्यात येत आहेत.बांध बंधिस्तीमुळे शेतातील पाणी शेतात आणि नदी खोलीकरणामुळे गावातील पाणी गावात अडवून गावातील भूगर्भातील पाणी साठा वाढणार आहे.यामुळे गावे टंचाई मुक्त होणार आहेत.- बाळासाहेब नितनवरे, तालुका कृषी अधिकारी
सहा हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
By admin | Updated: May 23, 2016 23:24 IST