देवळाली प्रवरा येथे शनिवारी रात्री ८ ठिकाणी घरफोड्या झाल्या. सोमवारी कानडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कानडे व दुधाळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दुधाळ बैठक सोडून निघून गेले. याप्रकरणी कानडे यांनी पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन मिटके यांनी शुक्रवारी बदलीचा आदेश काढला. पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट टिक्कल, पोलीस नाईक जानकीराम खेमनार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण ठोंबरे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्यांच्या जागी देवळाली प्रवरा पोलीस चौकीसाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, पोलीस चौकीचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ, पोलीस नाईक वैभव साळवे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भिसे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सागर माळी, पोलीस कॉन्स्टेबल शहामद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.