शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

नगर तालुक्यात राजकीय घमासानाचे संकेत

By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST

अहमदनगर : स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ नसतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी श्रीगोंद्यातून, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लामखडे यांनी पारनेरमधून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ नसतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी श्रीगोंद्यातून, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे यांनी पारनेरमधून तर राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी राहुरीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोकाटे यांनी आ. शिवाजी कर्डिले यांच्यावर टिकास्त्र सोडत वेळप्रसंगी अपक्ष लढण्याचा इरादा स्पष्ट केल्याने मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातही राजकीय घमासानाचे संकेत आहेत.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत नगर तालुका श्रीगोंदा, पारनेर व राहुरी मतदारसंघात विभागला गेला. परिणामी नगर तालुक्यातून कुणी आमदार होईल याच्याही आशा मावळल्या होत्या. राजकीय विश्लेषकांनीही नगर तालुक्याचा कुणी आमदार होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र आ.कर्डिले यांची राहुरीतून खेळी यशस्वी झाल्यानंतर आता अनेकांनी असा डाव खेळण्यासाठी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीचे नगरचे पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी आ.कर्डिले यांच्यावर अकार्यक्षमतेचे आरोप करत राहुरीतून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे. कर्डिले यांनी कुठलीच विकासकामे न करता तालुक्यातील सहकारी संस्था डबघाईला आणल्या असा आरोप मोकाटे यांनी केला. आपल्याला ५० गावातील सरपंचांचा आग्रह झाल्यानेच ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे यांनीही पारनेरमधून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे. नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघात येणाऱ्या सर्वपक्षीयांची मोट ते बांधत असून, आ. औटी यांच्यावरील नगर तालुक्यात असणारी युतीच्या कार्यकर्त्यांची नाराजी व शिवसैनिकांचे नुकतेच झालेले आंदोलन यामुळे लामखडे पारनेरची तयारी करीत आहेत. श्रीगोंदा मतदारसंघाची युतीची जागा सध्या भाजपाकडे आहे. मात्र भाजपाकडे सध्या निवडून येण्याच्या पात्रतेचा एकही उमेदवार नाही. प्रत्येक वेळी भाजपाला येथे पराभवाचाच सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष घनशाम शेलार यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध आहे. यामुळे ही जागा बदलून शिवसेनेला मिळावी यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर सेना नेत्यांना साकडे घातले आहे. ही जागा सेनेला मिळाल्यास सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांची तेथून उमेदवारी करण्याची तयारी आहे. तशी तयारी व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणीही त्यांनी सुरू केली आहे.(प्रतिनिधी)नगर तालुक्याच्या एकीची हाकनगर तालुक्यातील मतदार एकसंघ राहिले तर तिनही आमदार आपले (नगर तालुक्याचे) होतील अशी भविष्यवाणी आ.कर्डिले यांनी केली आहे. मी जे राहुरीत करून दाखवले ते पारनेर व श्रीगोंद्यातही होऊ शकते, अशी तालुका एकीची हाक त्यांनी दिली खरी पण या एकीसमोर मोठे आव्हान कायम आहे. त्यात मोकाटे यांनीच राहुरीतून आव्हान उभे करण्याची तयारी चालवली आहे.