शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्युप्रकरणी श्रीरामपूरच्या डॉक्टरला मागितली दहा लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:59 IST

श्रीरामपूर शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत.

श्रीरामपूर : शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी डॉ.अनारसे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती. या धमकीला वैैतागून अखेर अनारसे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये शहरातील समीर माळवे, तसेच रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (कल्याण) यांचा समावेश आहे. हे सर्व फरार झाले आहेत.रुग्ण उर्मिला रमेश गायकवाड यांच्या पोटात गोळा असल्याने २१ आॅक्टोबरला डॉ.अनारसे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर २४ आॅक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती न सुधारल्यामुळे नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथेही उर्मिला यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. अखेर २७ आॅक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.उपचारादरम्यान डॉ.संजय अनारसे यांनी हलगर्जीपणा केला व त्यामुळे उर्मिला यांचा मृत्यू झाला, असा आरोप समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड यांनी केला. रुग्णालयाची बदनामी करण्याची धमकी देत १० लाख रुपये खंडणी मागितली. जिवे मारण्याची तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. आरोपींवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी