शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम तुरुंगाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 05:59 IST

शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम यास जामीन मंजूर झाल्याने मंगळवारी त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली़ पोलिसांनी त्याला बंदोबस्तात पुण्यापर्यंत सोडले. तेथून तो परराज्यात गेल्याचे समजते. न्यायालयाच्या आदेशानुसार छिंदमला दर रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजेरी द्यायची आहे. महानगरपालिकेतील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी १६ फेब्रुवारीला फोनवरून बोलताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. श्रीपाद छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ जिल्हा न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नाशिक कारागृहात हलविण्यात आले होते़ ९ मार्चला न्यायालयाने जामीन मंजूर केला़ सोमवारी न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता झाली.

शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान श्रीपाद छिंदमने केले होते. तेव्हा नगरचा उपमहापौर असून त्याच्या विधानाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामुळे जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि छिंदमला उपमहापौरपदावरून काढून टाकण्यात आलं होतं.  त्याला अटकही करण्यात आली होती. 

दरम्यान छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे न्यायालयात सांगितले. अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. छिंदम याने स्वत:च न्यायालयात ०६ मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.०९) सुनावणी झाली होती.

छिंदम याने स्वत:वरील आरोप नाकारले असून फिर्यादीबरोबर राजकीय वाद असल्याने माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, अशी भूमिका छिंदम याने न्यायालयात मांडली. तसेच आई आजारी असून तिची देखभाल करायची आहे. मी कुटुंबातील कर्ता असल्याने माझा जामीन मंजुर करावा, असा युक्तीवाद केला. वकील नसल्यामुळे छिंदम याने स्वत:च न्यायालयात त्याची बाजू मांडली. सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देणा-या छिंदमने न्यायालयात मात्र, सर्व आरोप नाकारत घुमजाव केले. मी ते वक्तव्य केलेच नसल्याचे छिंदम याने न्यायालयात सांगितले होते.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज