शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा, कर्जत येथे कडकडीत बंद, पवारांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 14:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

ठळक मुद्देपवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंदव्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालयेही बंद होती. राष्ट्रवादीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.

श्रीगोंदा/कर्जत - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी (26 सप्टेंबर) श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जत येथे सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. येथील व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालयेही बंद होती. दुपारी बाराच्या सुमारास येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. शरद पवारांवर ‘ईडी’ने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा. राजकीय आकसातून ही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी थांबवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीगोंदा येथे सकाळपासूनच येथील व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, या प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. भाजप सरकारने केवळ निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन ही कारवाई केली आहे. लवकरात लवकर गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा  त्यांनी दिला.

शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि 70 लोकांवर ईडीमार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामती, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात या याचे पडसाद उमटत आहेत. 'टायगर अभी जिंदा है... पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है..' अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज परळी बंदचे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सरकारने केलेली कारवाई सुडबुद्धीची असून याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला. 

 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस