शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राहात्यात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार; एकास पाठलाग करुन पकडले : दोन जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:24 IST

राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे. 

राहाता/शिर्डी : शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास या तीन आरोपींनी मारहाण केली होती. यावेळी या तरुणाकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. सदर आरोपी शुक्रवारी (दि.१५ मे ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटारसायकलवर फिरताना वैभव ताठे यास दिसून आले. ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकाºयांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. त्यांनी आरोपीला घेरले. पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत जमाव त्यांच्यामागे धावला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर एकाने हातातील कोयता उगारला आणि परत पळ काढला. पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला. तर दोघे आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आहे.  नारायण म्हस्के असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक आहे. त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस करीत आहेत.फरार आरोपींचा शोध सुरूराहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. दोन फरार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती कळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. याप्रकरणी तपासाबाबत सूचना केल्या. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताCrime Newsगुन्हेगारीfireआग