Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री अकोले ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे बालविवाह आणि अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम प्रियकराविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या एका गरीब आदिवासी कुटुंबातील ११ वर्षांच्या मुलीला रविवारी रात्री अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे आणि डॉ. संकेत गडाख यांच्या लक्षात आले की ही मुलगी गर्भवती असून ती बाळंत होणार आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्परता दाखवत अकोले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत डॉ. संकेत गडाख यांच्या पथकाने या मुलीची प्रसूती केली. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पळवून नेऊन केला अत्याचार
चौकशीदरम्यान, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. साधारण १० ते ११ महिन्यांपूर्वी या नराधमाने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्या काळात त्याने तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. जेव्हा आरोपीला तिच्या गरोदरपणाबद्दल समजले, तेव्हा त्याने तिला सुगाव परिसरात आणून सोडून दिले आणि तो फरार झाला.
पोलिसांची कारवाई
अकोले पोलिसांनी या प्रकरणी पीडितेच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारती करत आहेत.या घटनेने सामाजिक क्षेत्रात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीला मातृत्वाची साधी समज नसतानाही तिच्यावर हे ओझं लादलं गेलं. अकोले तालुक्यात गेल्या काही महिन्यांत अल्पवयीन मातांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
Web Summary : An 11-year-old girl in Ahilyanagar delivered a baby after being kidnapped and repeatedly raped. Police have registered a case under the POCSO Act against the accused. The incident highlights the rising issue of underage pregnancies and sexual violence.
Web Summary : अहिल्यानगर में 11 साल की एक बच्ची ने अपहरण और बलात्कार के बाद बच्चे को जन्म दिया। पुलिस ने आरोपी के खिलाफ पोक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है। यह घटना कम उम्र में गर्भावस्था और यौन हिंसा के बढ़ते मुद्दे को उजागर करती है।