शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:22 IST

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार ...

ठळक मुद्देथकबाकीची आकडेवारीअहमदनगर जिल्हा - ३ लाख ४१ हजार ४३६ शेतकरी (२ हजार २८५ कोटी थकबाकी)संगमनेर विभाग- एकूण ८० हजार ६७ शेतकरी (५२१ कोटी थकबाकी)कोपरगाव ग्रामीण- १३ हजार ९६३ शेतकरी (६६ कोटी थकबाकी)कोपरगाव शहर- २ हजार २१६ शेतकरी (११ कोटी थकबाकी)राहाता- १४ हजार ९५३ शेतकरी (८२ कोटी थकबाकी)संगमनेर ग्रामीण- २० हजार ९७९ शेतकरी (१८५ कोटी थकबाकी)संगमनेर शहर- १३ हजार ५७० शेतकरी (८९ कोटी थकबाकी)अकोले- १० हजार ३४१ शेतकरी (६२ कोटी थकबाकी)राजूर- ४ हजार ४५ शेतकरी (२१ कोटी थकबाकी)

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील १६ हजार १७९ शेतक-यांच्या ७८ कोटी रूपयांच्या थकबाकीचा, संगमनेर विभागातील ८० हजार ६७ शेतक-यांच्या ५२१ कोटी रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. संगमनेर ग्रामीणमध्ये सर्वाधिक १८५ कोटी तर राजूरमध्ये सर्वात कमी २१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण भरमसाठ असल्याने बुधवारी सायंकाळी संगमनेर विभागात महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदार ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतीपंपांच्या सर्व रोहित्रांची वीज सायंकाळपासून गायब झाली. थकबाकी असलेल्या देयकाच्या २० टक्के रक्कम भरल्यास वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. या बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी.एन.चावडा(कोपरगाव ग्रामीण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.व्ही. महाजन (कोपरगाव शहर) आदी उपस्थित होते.

थकबाकीदार ७० टक्के शेतकरी ग्राहकांनी देयकाच्या किमान २० टक्के रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही. तसेच रोहित्र जळाल्यास ७० टक्के रक्कम भरूनच बदलून दिले जाईल. शेतकºयांनी वेळेत वीज देयके भरून महावितरणला सहकार्य करावे.-डी.बी.गोसावी, कार्यकारी अभियंता.

१५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शेती पंपांवर कॅपिसिटर बसविण्यात येणार आहेत. कॅपिसिटरमुळे वीज गळती थांबण्यास मदत होईल. अतिरिक्त वीज वापर नियंत्रणात येईल. त्यासाठी किमान ७० टक्के थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे.-डी.एन.चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण